पद्मावत सिनेमाबाबत वादग्रस्त वक्तव्ये करणारा, दीपिका पदुकोणचे नाक कापण्याची धमकी देणारा भाजप नेते सूरजपाल अमू यांना रूग्णालयात दाख करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सूरजपाल यांना गुरुग्राम येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी सूरजपाल अमू यांना ताब्यात घेण्यात आले आणि नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यानंतर आज त्यांना हरयाणा येथील कोर्टात हजर करण्यासाठी नेले जात होते त्याचवेळी त्यांची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्यांना गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना रोहतक या ठिकाणी असलेल्या रूग्णालयात नेण्यात आले.

पद्मावत सिनेमावरून जो वाद निर्माण झाला त्या वादादरम्यान संजय लीला भन्साळीचे शीर कापून आणणाऱ्याला दहा कोटींचे बक्षीस देईन असे अमू यांनी जाहीर केले होते. तसेच दीपिका पदुकोणचे नाक कापण्याचीही कथित धमकी त्यांनीच दिली होती.

पद्मवात सिनेमात इतिहास बदलण्यात आला आहे असा आरोप सूरजपाल अमू यांनी केला होता. पद्मवात सिनेमाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हरयाणाचे भाजप नेते सूरजपाल अमू चर्चेत आले होते. यानंतर संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांचा चाहता असलेल्या एकाने अमू यांच्याविरोधात तक्रारदाखल केली होती. पवन कुमार असे तक्रार करणाऱ्याचे नाव आहे.

सूरजपाल अमू यांनी कलाकारांबाबत वापरलेली वक्तव्ये संताप आणणारी आहेत असेही या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान अमू यांनी आता मला फारुक अब्दुल्ला यांना थोबाडीत मारायची आहे असेही म्हटले होते. भाजपमधून राजीनामा दिल्यावर त्यांनी हे वक्तव्य केले होते. राजीनामा देताना अमू यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर टीका केली होती. खट्टर यांच्या संतापी स्वभावामुळेच मी राजीनामा देतो आहे असेही त्यांनी स्पष्ट केले होते. सूरजपाल अमू यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला की आम्ही त्यांना कोर्टासमोर हजर करू अशी माहिती गुरुग्राम पोलीस ठाण्याचे जनसंपर्क अधिकारी रविंदर कुमार यांनी एएनआयला दिली आहे.