News Flash

भारत आणि पाकिस्तान दोघांनी समजुतदारपणा दाखविण्याची गरज- सुषमा स्वराज

दोन्ही देशांनी प्रादेशिक व्यापार आणि सहकार्याला बळकटी दिली पाहिजे, असेही स्वराज यांनी म्हटले.

कोणत्याही नावाखाली किंवा कोणत्याहीप्रकारे दहशतवादी आणि अतिरेकी शक्तींना अभय मिळेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी सुषमा स्वराज यांनी परिषदेत सहभागी आंतरराष्ट्रीय समुदायांना केले.

एकमेकांशी व्यवहार करायचा असेल तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी समजुतदारपणा आणि आत्मविश्वास दाखविण्याची गरज असल्याचे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. त्या बुधवारी इस्लामाबादमधील ‘हार्ट ऑफ एशिया’ या पाचव्या मंत्रीस्तरीय बैठकीत बोलत होत्या. जागतिक परिस्थितीत बदल घडत असून अशा वातावरणात जगाकडून पाकिस्तानसाठी सहकार्याचा हात पुढे केला जात आहे. कोणत्याही नावाखाली किंवा कोणत्याहीप्रकारे दहशतवादी आणि अतिरेकी शक्तींना अभय मिळेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे आवाहन यावेळी सुषमा स्वराज यांनी परिषदेत सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय समुदायांना केले. या बैठकीच्या निमित्ताने आम्ही पाकिस्तानच्या दिशेने हात पुढे करत आहोत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी समजुतदारपणा दाखविण्याची हीच वेळ आहे. या माध्यमातून दोन्ही देशांनी प्रादेशिक व्यापार आणि सहकार्याला बळकटी दिली पाहिजे, असेही स्वराज यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 6:20 pm

Web Title: sushma swaraj meets nawaz sharif says time for india pakistan to display maturity
Next Stories
1 नरेंद्र मोदी पुढील वर्षी पाकिस्तानला जाणार!
2 नेताजींच्या ठाव-ठिकाण्याबाबतचे रहस्य उलगडणार?
3 पंतप्रधान कार्यालयाकडून ‘शत प्रतिशत’ सुडाचे राजकारण – राहुल गांधी
Just Now!
X