News Flash

तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

'तहलका'तील पत्रकार तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले संपादक तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सोमवारी १२ दिवसांनी वाढ करण्यात आली.

| December 23, 2013 02:08 am

‘तहलका’तील पत्रकार तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले संपादक तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सोमवारी १२ दिवसांनी वाढ करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानंतर त्यांच्या वकिलांनी लगेचच जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
तेजपाल यांना सुनावण्यात आलेली १२ दिवसांच्या न्यायालयीने कोठडीची मुदत सोमवारी संपल्यामुळे तेजपाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. सारिका फालदेसाई यांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १२ दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय दिला. तेजपाल यांना वास्को शहराजवळ असलेल्या सादा कारगृहात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, तेजपाल यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्यापासून पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी केलेली नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात केला. जामीन अर्जावर २६ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 2:08 am

Web Title: tejpals judicial custody extended by 12 days
टॅग : Tarun Tejpal
Next Stories
1 देवयानी खोब्रागडेंच्या सुटकेसाठी ऑनलाईन याचिका
2 हातसफाई!
3 ‘हर हर मोदी’ घोषणा हा शंकराचा अपमान, भाजपने मागावी माफी – सप
Just Now!
X