जम्मू-काश्मिरमधील किश्तवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका ठिकाणाचा पर्दाफाश करण्यात जवानांना रविवारी यश आले. या कारवाईत मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठी जप्त करण्यात आला.

सुरक्षा विभागाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सेना व विशेष मोहिम पथकाने केश्वान भागातील पंथना येथे घेराबंदी व शोधमोहिम राबली होती. या दरम्यान दहशतवाद्यांच्या एका ठिकाणाचा पर्दाफाश करण्यात आला.

या ठिकाणीहुन जवानांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठ्यासह स्लीपिंग बॅग,पलंग, स्टीलचे चार बॅाक्स, एक गॅस सिलेंडर, फळांच्या रसाची कॅन, नुडल्स, एक हाताची घड्याळ, तीन मासिक व तीन ब्लॅकेंट एवढ साहित्य जप्त करण्यात आले. हे सर्व साहित्य दहशतावादी जमाल दीन याच्या घरापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर आढळले आहे.