आपल्या साहसी आणि हेरकथांनी साऱ्या जगास भुरळ घालणारे अमेरिकेचे ‘बेस्ट सेलर’ लेखक टॉम क्लॅन्सी यांचे येथे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. हॉलिवूडचे अनेक लोकप्रिय चित्रपट क्लॅन्सी यांच्या कथांवर आधारित होते. ‘द हण्ट फॉर रेड ऑक्टोबर’ या १९८४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीसह त्यांच्या अनेक कथा आणि कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या. ‘पॅट्रियट गेम्स’, ‘क्लीअर अ‍ॅॅण्ड प्रेझेण्ट डेंजर’ आदी कादंबऱ्याही वाचकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.लेखनाचा अत्यंत उच्च दर्जा संभाळणाऱ्या क्लॅन्सी यांना कथा सांगण्याची अत्यंत चांगली दृष्टी होती, या शब्दांत पेन्ग्विन समूहाचे कार्यकारी संचालक डेव्हीड श्ॉन्क्स यांनी क्लॅन्सी यांचा गौरव केला. मला आता त्यांची उणीव जाणवेलच परंतु जगभरातील त्यांच्या लक्षावधी चाहत्यांनाही त्यांची उणीव निश्चितपणे जाणवेल, असे ते पुढे म्हणाले.