News Flash

बारामुल्लातील दहशतवादी हल्ल्याचा वचपा; लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर सज्जाद ठार

चकमकी दरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर सज्जाद उर्फ हैदर याचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस व जवानांसाठी हे मोठे यश असल्याचे काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले आहे. तसेच, आतापर्यंत या चकमकी दरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे जवानांनी ठार केलेल्या दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी बारामुल्लामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्याचा देखील समावेश असल्याची माहिती आयजी विजय कुमार यांनी दिली आहे.

या अगोदर आज सकाळी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील एक स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) शहीद झाले होते.

बारामुल्लातील क्रिरी भागात हा हल्ला झाला होता. या नंतर हल्ला झालेल्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती व परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा जवानांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान, दुपारी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली व यात आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवर दहशतवाद्यांनी केलेला हा तीन दिवसातील दुसरा हल्ला होता. या अगोदर १४ ऑगस्ट रोजी श्रीनगरमधील नवगाम सेक्टरमध्ये दोन पोलीस दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. तर एकजण जखमी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 5:11 pm

Web Title: top let commander sajjad alias haider killed in baramulla encounter msr 87
Next Stories
1 LinkedIn वर नोकरी शोधणाऱ्यांची संख्या झाली दुप्पट; जाणून घ्या, किती जणांना मिळाल्या नोकऱ्या
2 मर्सिडीज, बुगाटी आणि पोर्शेची धडक; कोटींच्या घरात असलेला नुकसानाचा आकडा ऐकून धक्का बसेल
3 भाजपा नेत्याला दारूची तस्करी करताना अटक
Just Now!
X