News Flash

जीव देऊन जिगरबाज गाइडने वाचवले सात पर्यटकांचे प्राण

पर्यटकांनी भरलेली एक बोट नदीत कलंडल्याचे पाहुन घेतली होती उडी

संग्रहीत

एका जिगरबाज पर्यटक गाइडने स्वतःचे जीव देऊन जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील दोन पर्यटकांसह पाच जणांचा जीव वाचवल्याची घटना पहलगामध्ये घडली. पर्यटकांनी भरलेली एक बोट अचानक आलेल्या वादळी वा-याने पहलगाम येथील मवुरा भागात लिडेर नदीत कलंडली होती. हे पाहाताच गाइड रौफ अहमद डार याने जीवाची बाजी लावत नदीत उडी घेत बुडणाऱ्या सात पर्यटकांचे प्राण वाचवले. मात्र त्याला स्वतःचे प्राण वाचण्यात अपयश आल्याने त्याचा मृत्यू झाला.

या बोटीत असलेल्या सात पर्यटकांपैकी दोन विदेशी पर्यटक होते. त्यांना वाचवताना रौफ नदी पात्रात बेपत्ता झाला. यानंतर त्याच्या शोधासाठी एसडीआरएफ आणि पोलिसांनी मोहीम राबवली. अखेर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह लिडेर नदीवरील भवानी पुलाजवळ आढळून आला. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.

आपला जीव देऊन सात पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या रौफ अहमद डारच्या शौर्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. राज्याचे पर्यटन प्रभारी व राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे सल्लागार खुर्शीद गनई यांनी डार यांच्या मृत्यू बाबत दुःख व्यक्त केले आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता नदीच्या तीव्र प्रवाहात स्वःला झोकुन देत सात जणांचे जीव वाजवणे हे सर्वोच्च बलिदान आहे, असे त्यांनी म्हटले. तर जम्मू -काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी डार यांच्या शौर्याला सलाम केला व त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रूपयांची मदत जाहीर केले आहे. अनंतनागच्या उपायुक्तांनी शौर्य पुरस्कारासाठी रौफच्या नावाची शिफारस केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 10:37 pm

Web Title: travel guide dies for rescuing 7 tourists
Next Stories
1 कोणावरही कोणतीच भाषा लादली जाणार नाही; भाषा वादावर सरकारचा खुलासा
2 योगी सरकारचा नवा निर्णय; मंत्र्यांना बैठकीत मोबाइल बंदी
3 मे मध्येही जीएसटी वसूली १ लाख कोटींपेक्षाही जास्त
Just Now!
X