अमेरिकेबद्दल बोलताना ‘जरा जपूर शब्द वापरा’ या भाषेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांना इशारा दिला आहे. इराणचे तथाकथित ‘सर्वोच्च नेते’ अलीकडे सर्वोच्च राहिलेले नाहीत. ते अमेरिका आणि युरोपबद्दल वाईट बोलत असतात असे ट्रम्प म्हणाले.

खामेनी यांनी तेहरानमध्ये केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे टि्वट केले आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, खामेनी यांनी अमेरिकेवर हल्लाबोल करताना ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे देश अमेरिकेचे पाठिराखे असल्याचे म्हटले होते.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?

“इराणची अर्थव्यवस्था कोसळत आहे. लोकांना त्रास सहन करावा लागतोय. शब्द वापरताना खामेनी यांनी काळजी घ्यावी” असे ट्रम्प यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. इराणच्या जनतेला त्यांची स्वप्ने साकार करणारे सरकार हवे आहे. इराणच्या नेत्यांनी देशाची वाट लावण्याऐवजी दहशतवादाची साथ सोडून, पुन्हा एकदा इराणला महान देश बनवावे असे ट्रम्प आपल्या टि्वटमध्ये म्हणाले आहेत.

अमेरिकेने एअर स्ट्राइकमध्ये इराणचा टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानीचा खात्मा केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची सुरुवात झाली. इराणने बदला म्हणून इराकमधील अमेरिकेच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर युद्धाची शक्यता वर्तवली जात होती. पण दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतले.

खामेनी अमेरिकेला बदमाश का म्हणाले?
बदमाश अमेरिकन सरकार सतत आम्ही इराणीयन जनतेसोबत आहोत असे म्हणत असते. पण ते खोट बोलतायत. तुम्ही इराणीयन जनतेसोबत असाल तर ते, फक्त त्यांच्या ह्दयात खंजीर खुण्यासाठी. आतापर्यंत असे करण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात आणि यापुढेही तुम्हाला यश मिळणार नाही.