अटीतटीच्या लढतीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फ्लोरिडा, टेक्सास या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्राध्यक्षपद कायम राखण्यासाठी ट्रम्प यांना फ्लोरिडामध्ये विजय अत्यंत आवश्यक होता. फ्लोरिडामध्ये एकूण २९ इलेक्टोरल वोटस आहेत.

२००० सालापासून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराने फ्लोरिडामध्ये विजय मिळवलाय, त्याने पुढे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. फ्लोरिडाशिवाय कुठल्याही रिपब्लिकन उमेदवारा व्हाइट हाऊसची शर्यत जिंकता आलेली नाही. २०१६ मध्ये ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर फ्लोरिडात फक्त एक टक्का मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प दोघांनी फ्लोरिडामधल्या प्रचारावर विशेष भर दिला होता. ट्रम्प यांनी ओहायो आणि लोवामध्ये सुद्धा विजय मिळवला आहे. सध्याच्या मतमोजणीच्या निकालानुसार फ्लोरिडा, टेक्सास ही राज्य जिंकल्यामुळे ट्रम्प यांच्याकडे २१३ इलेक्टोरल वोटस आहेत तर बायडेन यांना २१० मते मिळाली आहेत. टेक्सासमध्ये ३८ इलेक्टोरल मते आहेत.