छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील इरापल्ली येथे आज सकाळी कोब्रा बटालियनचे कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला. मात्र, दोन जवान शहीद झाले. शिवाय, अन्य चार कमांडो जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. चकमकीच्या ठिकाणावरून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत.
#UPDATE Chhattisgarh: Two CoBRA personnel of 204 battalion have lost their lives in the encounter with naxals at Irapalli village in Bijapur district. https://t.co/jFb2zHaKIb
— ANI (@ANI) February 10, 2020
आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कोब्रा बटालियनचे कमांडो शोधीमोहीम राबवत असताना, त्यांच्यावर इरापल्ली गावाजवळ नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले. तर कमांडोंनी नक्षलवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला. या चकमकीत अन्य चार कमांडो जखमी झाल्याची देखील माहिती आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 2:49 pm