News Flash

लंडनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून दोन ठार

लंडनच्या मध्यवर्ती भागात बुधवारी एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान दोघे जण ठार झाले, तर अन्य दोघे जखमी झाले. थेम्स नदीच्या तीरावरील एका उंच इमारतीवर

| January 17, 2013 05:53 am

लंडनच्या मध्यवर्ती भागात बुधवारी एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान दोघे जण ठार झाले, तर अन्य दोघे जखमी झाले. थेम्स नदीच्या तीरावरील एका उंच इमारतीवर असलेल्या क्रेनवर आदळून सदर हेलिकॉप्टर कोसळले.
लंडनमधील थेम्स नदीच्या तीरावर सेंट जॉर्ज व्हार्फ ही निवासी इमारत असून तिचे बांधकाम सुरू होते. या इमारतीवरील क्रेनला धडक दिल्यानंतर ते कोसळले. त्यामध्ये दोन ठार आणि दोन जखमी झाले असून जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सदर हेलिकॉप्टरमध्ये केवळ वैमानिकच होता, त्यामध्ये प्रवासी नव्हते. वैमानिकाबाबत त्वरित माहिती मिळू शकलेली नाही. हेलिकॉप्टर कोसळल्याने दोन गाडय़ांचे नुकसान झाले. वॉण्डसवर्थ मार्गावर ही दुर्घटना घडली. घटनेचे वृत्त कळताच अग्निशामक दलाचे ६० बंब घटनास्थळी रवाना झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 5:53 am

Web Title: two killed in helicopter crashed in landon
Next Stories
1 भारत युद्धखोर, तर आम्ही संयमी
2 काद्रींविरोधात अटक वॉरण्ट
3 जनसंपर्कगुरू एडलमन निवर्तले
Just Now!
X