20 January 2021

News Flash

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार अब्दुल माजिदला अटक; २४ वर्षांपासून होता फरार

गुजरात एटीएसची कामगिरी; झारखंड येथून पकडण्यात यश

गुजरात एटीएसला फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार, अब्दुल माजिद कुट्टी याला झारखंडच्या जमशेदपूर येथून अटक करण्यात यश आलं आहे. अब्दुल माजिद हा तब्बल २४ वर्षांपासू फरार होता. आता त्याला अटक करण्यात आल्याने दाऊदशी संबंधित महत्वपूर्ण माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुट्टी हा केरळचा रहिवासी आहे. तो १९९६ मध्ये १०६ पिस्तुलं, ७५० काडतूसं आणि जवळपास चार किलो आरडीएक्स गोळा करण्याच्या गुन्ह्यात सहभागी होता. अन्य एका वरिष्ठ एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, अन्य या प्रकरणी अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र कुट्टी २४ वर्षांपासून फरार होता व झारखंडमध्ये दडून बसलेला होता.

एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला आमच्या गुप्तचर विभागाकडून त्याच्या ठिकाणाचा पत्ता लागला होता. यानंतर एटीएसचे पथक झारखंडला रवाना केले गेले व त्याला अटक करण्यात आली. एटीएसच्या मते अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमक आणि त्याच्या सिंडिकेटची गुजरात आणि मुंबईत अशांतता निर्माण करण्याची योजना होती आणि त्यामुळेच त्याने एवढ्या मोठ्याप्रमाणावर आरडीएक्स जमवले होते.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींची जेव्हा चौकशी केली गेली होती. तेव्हा कुट्टीचे नाव समोर आले होते. तेव्हापासून तो फरार झाला होता. सध्या कुट्टीला करोना तपासणीसाठी नेण्यात येईल व नंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 3:13 pm

Web Title: underworld don dawood colleague abdul majid arrested he had been absconding for 24 years msr 87
Next Stories
1 पाकिस्तानी लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, चौघांचा मृत्यू
2 “सीबीआयने अजूनही सांगितलं नाही, सुशांतची हत्या की आत्महत्या?”; देशमुख यांचा सवाल
3 ‘एमआयएम’ने वळवला गुजरातकडे मोर्चा; आगामी निवडणुकांसाठी ‘या’ पक्षाशी केली हातमिळवणी
Just Now!
X