News Flash

निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप, ट्रम्प यांची सर्वोच्च न्यायालयात जाण्याची घोषणा

ट्रम्प यांनी आपल्याच विजयाचा केला दावा...

अपेक्षेप्रमाणे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक ठरली आहे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु आहे. मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचाही आरोप केला आहे. पुढील मतदान थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आपण या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपण जिंकणारच होतो, म्हणजे आपण जिंकलोच आहोत” असे ट्रम्प व्हाइट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

“आपण दुसऱ्या अन्य राज्यात जिंकतोय हे जाहीर करणार होतो आणि तितक्या हा घोटाळा झाला. ही अमेरिकन लोकांची फसवणूक आहे आणि आम्ही ही फसवणूक होऊ देणार नाही” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेत उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प त्यांच्या शेजारी होत्या. “रिपब्लिकन विजयाचा आनंद साजरा करणार होते, तितक्यात अचानक हे घडलं” असे ट्रम्प म्हणाले. “निकाल अभूतपूर्व आहे. आपण नक्कीच जिंकणार आहोत. आपण राज्यांमध्ये खूपच पुढे आहोत. तिथून आकडे येत आहेत. ते आपली बरोबर करु शकत नाहीत” असे ट्रम्प म्हणाले.

ज्या राज्यांमध्ये मतमोजणी सुरु आहे, तिथे मोठया मताधिक्क्याने रिपब्लिकन विजयी होतील असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी फ्लोरिडा, ओहायो आणि टेक्सास या महत्त्वाच्या राज्यात विजय मिळवला त्यामुळे बायडेन यांना विजयी मताधिक्क्य मिळवता आले नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 1:15 pm

Web Title: us election result donald trump alleges fraud says will go to supreme court dmp 82
Next Stories
1 US Election 2020 : मतमोजणी सुरु असतानाच ट्रम्प यांनी केलेलं ‘ते’ ट्विट ट्विटरने केलं ब्लॉक
2 अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या फ्लोरिडा, टेक्सासमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मारली बाजी
3 अर्णब गोस्वामी अटकेवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…