25 November 2020

News Flash

बिहारमध्ये हिंसाचार; जनता दल राष्ट्रवादी पार्टीच्या उमेदवाराचा गोळीबारात मृत्यू

बिहारच्या निवडणुकीला गालबोट लागले आहे.

पाटणा : बिहारमध्ये जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांच्यावर काही जणांनी गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आज हिंसाचारही घडला. जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं बिहारच्या निवडणुकीला गालबोट लागलं आहे.

शिवहर जिल्ह्यातील हाथरस येथे ही घटना घडली असून जनता दल राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार नारायण सिंह यांच्यावर शनिवारी काही लोकांनी गोळीबार केला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तात्काळ एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, गंभीर दुखापत झाल्याने उपचारांदरम्यान नारायण सिंह यांचा मृत्यू झाला. यावेळी आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारण हल्ल्यात ते देखील जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 10:23 pm

Web Title: violence in bihar janata dal ncp candidate shot dead aau 85
Next Stories
1 पाऊस आता चार दिवसांचाच पाहुणा; २८ ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची पूर्णपणे माघार
2 पंजाबच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराबाबत राहुल गांधी गप्प का?-निर्मला सीतारामन
3 धर्माच्या नावावर आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील – फारुख अब्दुल्ला
Just Now!
X