पृथ्वीपासून २६ कोटी प्रकाशवर्षे दूर हायड्रोजनच्या गूढ वायुमेघाचा जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) साहाय्याने शोध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या वायुमेघाचा व्यास पृथ्वी असलेल्या आकाशगंगेच्या चौपट असल्याचे आढळून आले आहे. इतक्या प्रचंड आकाराच्या वायुमेघाची निर्मिती कशी झाली याचा आता अभ्यास केला जाणार आहे.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील पीएच.डी.चा विद्यार्थी ओंकार बाईत याने संशोधक डॉ. योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास केला आहे. या विषयीचे संशोधन ‘मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.