अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  भारतात दाखल झाले आहेत. चालत्या-फिरत्या व्हाइट हाऊस म्हणजे ‘एअर फोर्स वन’मधून ट्रम्प भारतात पोहोचले. ट्रम्प येण्याआधी त्यांची खास लिमोजीन कार ‘द बीस्ट’, ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर भारतात पोहोचले आहे. कार आणि हेलिकॉप्टरप्रमाणे ट्रम्प यांचे एअर फोर्स वन सुद्धा खास आहे.

बोईंग ७४७-२०० बी सीरीज प्रकारातील हे विमान आहे. हे विमान काही मिनिटात उड्डाणासाठी सज्ज असते. हे विमान म्हणजे उडत मिनी व्हाइट हाऊसच आहे. या विमानात बसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगातल्या कुठल्याही भागात संपर्क साधू शकतात. अमेरिकेवर हल्ला झाल्यास मोबाइल कमांड सेंटरसारखा या विमानाचा वापर करु शकतात.

एअरफोर्स वन एकटे उड्डाण करत नाही
ट्रम्प यांचे एअरफोर्स विमान कधी एकटे उड्डाण करत नाही. काही कार्गो विमाने नेहमीच या विमानाच्या मागे-पुढे असतात. ट्रम्प यांना कुठल्याही वस्तूंची कमतरता भासू नये, यासाठी ही कार्गो विमाने सोबत असतात.

हवेतही इंधन भरता येते
एअरफोर्स वन विमान अनेक अंगानी खास आहे. या विमानाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे आपातकालीन किंवा प्रतिकुल परिस्थितीत या विमानामध्ये हवेतच इंधन भरण्याची सुविधा आहे.

इलेक्ट्रो मॅग्नेटिक प्लसचा परिणाम होत नाही
एअरफोर्स वन अत्याधुनिक आणि सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टिमचे सुसज्ज आहे. अमेरिकेवर हल्ला झाल्या मोबाइल कमांड सेंटरसारखा राष्ट्राध्यक्ष या विमानाचा वापर करु शकतात. या विमानात ज्या कुठल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहे. त्यावर इलेक्ट्रो मॅग्नेटिक प्लसचा परिणाम होत नाही. त्यामुळे इलेक्ट्रोनिक उपकरणे बंद पडत नाहीत.

विमानात नेहमी डॉक्टर असतो
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नेहमीच एक डॉक्टर विमानामध्ये असतो.

अजून काय खास आहे विमानात
ट्रम्प यांच्या या खास विमानात ४ हजार चौरस फुटाची जागा आहे. यात तीन मजले असून ट्रम्प यांच्यासाठी खास सूट आहे. एक मोठे ऑफीस आणि कॉन्फरन्स रुम आहे. १०० लोकांचे जेवण बनवण्याची सुविधा या विमानात आहे. या विमानातून १०२ लोक प्रवास करु शकतात. ज्यामध्ये २६ केबिन क्रू चे सदस्य आहेत.

प्रतितास १०१३ किमी वेग
एअरफोर्स वन ३५ हजार फूट उंचीवर १०१३ किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करु शकते. ४१,१०० फूट उंचीवरुन उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे. एअरफोर्स वनच्या प्रतितास उड्डाणाचा खर्च एक कोटी ३० लाख रुपये आहे.