News Flash

पाक हाय कमिशनच्या कर्मचाऱ्यावर अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप

महिलेला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्या प्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

महिलेला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्या प्रकरणी पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नवी दिल्लीतील सरोजिनी नगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी या कर्मचाऱ्याला नेण्यात आले होते.

बाजारपेठेत हाय कमिशनच्या कर्मचाऱ्याने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा महिलेचा आरोप होता. कर्मचाऱ्याला महिलेचा आरोप मान्य नव्हता.

बाजारपेठेत गर्दी असल्यामुळे चुकून स्पर्श झाला असे कर्मचाऱ्याचे म्हणणे होते. त्या कर्मचाऱ्याने महिलेची माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 5:32 pm

Web Title: woman accuses pak high commission staff of inappropriate touch
Next Stories
1 मोदींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी एक हजाराहून अधिक झाडांची कत्तल
2 जेएनयू घोषणाबाजी : तीन वर्षांनंतर कन्हैय्यासह 10 जणांविरोधात आरोपपत्र
3 पत्नीला प्रसूती कळा, भरधाव ट्रक पळवताना ३ पोलिसांसह चौघांचा मृत्यू
Just Now!
X