जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष महंमद यासिन मलिक यांना जेकेएलएफचा पाकिस्तानात मरण पावलेले नेते अमानुल्ला खान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जात असताना बुधवारी स्थानबद्ध करण्यात आले. अमानुल्ला खान यांचा मंगळवारी पाकिस्तानात मृत्यू झाला होता. गयीबाना निमाझ ए जनाझा या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी जात असताना मलिक याला पोलिसांनी अटक केली असे जेकेएलएफच्या निवेदनात म्हटले आहे. जेकेएलएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, अधिकाऱ्यांनी लाल चौक, मसुमा, कोकरबझार, कोठीबाग, अबी गुझार व कोर्ट रोड या भागात संचारबंदी लावली होती.
जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीच्या संस्थापकांपकी एक असलेला अमानुल्ला खान याचा पाकिस्तानात रावळिपडी येथे मृत्यू झाला. दरम्यान हुरियन कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवैझ उमर फारूख यांनाही नजरकैदेत ठेवले आहे. हुरियतच्या प्रवक्त्याने सांगितले की, मिरवैझ यांना सकाळपासूनच नजरकैदेत ठेवले असून ते लाल चौक येथे अमानुल्ला खान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणार होते त्यापूर्वीच पोलीस त्यांच्या निगीन रेसिडेन्स या निवासस्थानी आले व त्यांना नजरकैदेत टाकले. अमानुल्ला खान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा होणार असल्याने अधिकाऱ्यांनी श्रीनगरच्या अनेक भागांत संचारबंदी लागू केली आहे. लालचौक, मसुमा व आजूबाजूच्या भागात जेकेएलएफला प्रार्थना सभा घेण्यापासून रोखण्यात येत आहे. या भागात निमलष्करी दले मोठय़ा प्रमाणात तनात करण्यात आली आहेत. लाल चौक या व्यापारी परिसरातील सर्व दुकाने बंद होती तर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी