आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची १२२ कोटींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय सक्तवसूली संचलनालयाने घेतला आहे. दुबईस्थित एम्मार प्रॉपर्टीजच्या हैदराबादमधील बंगले आणि अपार्टमेंट उभारण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने भूखंडवाटप झाल्याचे उघड झाल्यानंतर ईडीने या ७१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचे आदेश दिले होते. यासह काही खासगी कंपन्यांवर मेहेरनजर केल्याप्रकरणी जगन रेड्डी यांच्याशी संबंधित मे. जगती पब्लिकेशन लि.ची ५१ कोटींची मालमत्ता आणि १४.५० कोटींच्या मुदत ठेवी जप्त करण्याचे आदेशही ईडीने दिले होते.