उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे एका अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी मात्र फरार आहे. ही १५ वर्षीय मुलगी १४ डिसेंबरला शाळेतून घरी न परतल्याने पालकांनी तिचा शोध सुरू केला, मात्र येथील धरौली गावात या मुलीला तिघांनी डांबून ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शनिवारी तिने स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या मुलीने या आरोपींची माहिती पोलिसांना दिली असून यातील राजू या व्यक्तीविरोधात पोलिसांनी बलात्काराचा, तर बसंतलाल व साहेबादीन या त्याच्या सहकाऱ्यांवर कटकारस्थान रचण्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.