जम्मू विमानतळ दोन स्फोटांनी हादरलं आहे. भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक विभागात हे दोन स्फोट झाले आहेत. कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही झालेल्या या स्फोटांमुळे चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान स्फोटात कोणीही जखमी किंवा कोणतंही नुकसान झालं नसल्याचं भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आलं आहे. ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून दहशतवादी हल्ला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेला नाही.

रविवारी पाच मिनिटांच्या अंतरावर हे दोन स्फोट झाले आहेत. रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी पहिला तर १ वाजून ४२ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीचं छपराचा भाग कोसळला आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला असून यासाठी स्फोटक उपकरणाची मदत घेण्यात आली.

pune airport new terminal marathi news
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं ‘उड्डाण’ कशामुळं रखडलं? अखेर समोर आलं कारण…
Ban on use of drones due to Prime Minister visit to Pune print news
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामुळे ड्रोन वापरण्यास बंदी
IndiGo flights delayed after system crashes
पुणे विमानतळावर प्रवाशांचे हाल संपेनात! इंडिगोच्या यंत्रणेतील बिघाडाने उड्डाणाला तीन तासांचा विलंब
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…

भारतीय हवाई दलाने ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी सकाळी जम्मू एअर फोर्स स्टेशनमध्ये दोन कमी तीव्रतेचे स्फोट झाले. एकामुळे इमारतीच्या छताचं नुकसान झालं असून दुसरा मोकळ्या परिसरात पडला. स्फोटात कोणतंही नुकसान झालेलं नाही. याप्रकरणी स्थानिक यंत्रणांसोबत तपास सुरु आहे”.

स्फोटांनंतर काही वेळातच संपूर्ण परिसर सील करण्यात आला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सध्या घटनास्थळी असून स्फोटांचं मुख्य कारण शोधत आहेत.


इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एनसजी आणि एनआयएची टीमदेखील घटनास्थळी पोहोचत आहे.

दरम्यान स्फोटांची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.