जम्मू आणि काश्मीरमध्ये  लष्कर आणि लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांमध्ये चकमक झाल्याचं वृत्त आहे. या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले आहेत. हांदवाडामध्ये ही चकमक झाली. हांदवाडाच्या वारिपोरा भागामध्ये ही चकमक झाली. या भागामध्ये अतिरेकी लपल्याचं सुरक्षादलांना गुप्तचर यंत्रणांनी सांगितल्यांवर हे आॅपरेशन करण्यात आलं. या भागामध्ये सुरक्षा दलं दहशतवाद्यांचा शोध घेत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी दिलेल्या चोख प्रत्त्युत्तरात हे दहशतवादी ठार झाले.

या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. हे दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याचं म्हटलं जातं. पण याचीही चाचपणी केली जात आहे. या दहशतवाद्यांकडून दोन शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत. या परिसरामध्ये आता सॅनिटाझेशन आॅपरेशन चालू आहे.

२६ एप्रिलला जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका कॅप्टनसह तिघे जण शहीद झाले होते. त्या फिदायीन हल्ल्यामध्ये आज ठार झालेले दहशतवादी सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

 

#FLASH 2 Lashkar-e-Taiba terrorists killed in an encounter between terrorists&security personnel at Handwara’s Waripora. Search operation on

— ANI (@ANI_news) May 14, 2017