मणिपालयेथे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचे अपहरण; सामूहिक बलात्कार

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका २२ वर्षीय विद्यार्थिनीचे तिच्या विद्यालयाच्या परिसरातून अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याची घटना आज शनिवार उघडकीस आली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका २२ वर्षीय विद्यार्थिनीचे तिच्या विद्यालयाच्या परिसरातून अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्याची घटना आज शनिवार उघडकीस आली आहे.
मणिपाल येथे काल शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास तीन नराधमांनी या विद्यार्थिनीचे अपहरण करुन बलात्कार केला व त्यानंतर पीडीत विद्यार्थिनीला चालत्या गाडीतून विद्यालयाच्या परिसरात (कॅप्मसमध्ये) टाकून दिले. त्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तसेच हातावर व मानेवर गंभीर जखम झाली असल्याचे उडुपीचे पोलीस अधीक्षक डॉ.बोरलीनागैय्या यांनी सांगितले.    
सदर प्रकरणी रिक्षाचालकासह त्या तिघांचा आम्ही शोध घेत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 22 year old medical student kidnapped gangraped in edu hub manipal

ताज्या बातम्या