वाई: सातारा लोकसभेचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अटक व्हावी अशी इच्छा नाही असे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २०१३-१४ मध्ये बांधलेल्या झालेला ४६६ गाळ्यापैकी ४५ गाळे आपल्या कुटुंबीयांच्या नावावर केले आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अत्यल्प किमतीत एक लाख रुपयात एक गाळा अशी किंमत ठरवून त्यातून त्यांनी चार हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला.
मुंबईमध्ये शेतमाल विकण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्कामासाठी व शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षांसाठी व कामानिमित्त मुंबई येथे गेल्यानंतर मुक्कामाची सोय म्हणून जी जागा होती. त्या जागेवर हे गाळे व फ्लॅट्स त्यांनी बांधले होते. यातून त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. याची चौकशी रीतसर झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १२ एप्रिल रोजी याची नोंद घेतली आहे. या गैर व्यवहारातून त्यांनी शेतकऱ्यांची शासनाची आणि बाजार समितीची फसवणूक केली आहे.
हेही वाचा…शशिकांत शिंदे यांना अटक झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
रात्री दीड वाजता कलम ४०९, ४२० आणि ३४ या अन्वये बाजार समितीच्या २५ संचालकांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात त्यांचा समावेश आहे. यामध्ये त्यांना अजामीन पात्र कलम लावण्यात आले आहे. याबद्दलची माहिती मला नाही असे त्यांनी सांगितले. त्यांना अटक झाल्यास या निवडणुकीवर मोठा परिणाम होईल असे त्यांना विचारले असता त्यांना अटक व्हावी अशी इच्छा नाही असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…माढा आणि साताऱ्यातून लाखाच्या मताधिक्याने जिंकू, शरद पवार यांचा दावा
कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे याचीही माहिती मला नाही. मात्र त्यांना आता अटक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीवर मोठा परिणाम होईल असे सांगितले असता महेश शिंदे म्हणाले त्यांना अटक व्हावी अशी इच्छा नाही. मात्र त्यांनी जी काही फसवणूक केली आहे. त्यातून त्यांनी जे काही गाळे फ्लॅट्स त्यांच्या नावावर करून घेतले आहेत. ते त्यांनी परत दिले पाहिजेत. यशवंत विचारांचा वारसा सांगून तुम्ही जर साताऱ्यातून निवडणूक लढवत असाल तर तुम्हाला हे गाळे परत दिले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.