झारखंडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत केंद्रीय सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाल्याची घटना मंगळवारी घडली. यावेळी पाच जवान जखमी झाले आहेत. अमवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारवाधीच्या जंगलात केंद्रीय सुरक्षा दल, विशेष कृती दल आणि राज्य पोलीस दलाचे जाग्वार पथक मंगळवारी दुपारच्या सुमारास संयुक्तरीत्या गस्त घालत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी उंच कडय़ावरून सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछुट गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनीदेखील प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यावेळी उडालेल्या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.