नवी दिल्ली : दिल्लीत गतवर्षी बलात्काराची ३१३७ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यात अल्पवयीनांवरील बलात्काराचे गुन्हे हे ३१ टक्के  आहेत, असे एका स्वयंसेवी संस्थेने म्हटले आहे.

प्रजा फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार प्रमुख गुन्ह्यंबाबत तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण पाच वर्षांत कमी झाले आहे. बलात्काराबाबतच्या तक्रारी नोंदवण्याचे प्रमाण १ टक्कय़ाने तर खुनाच्या गुन्ह्यंची नोंद ९ टक्कय़ांनी कमी झाली आहे.

गेल्यावर्षी दिल्लीत  बलात्काराचे ३१३७ गुन्हे नोंद झाले आहेत, त्यात ९६९ गुन्हे  बाललैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायद्यातील कलमानुसार दाखल झाले आहेत. १६ ते १८ वयोगटातील मुलांवर बलात्काराच्या ४२५ घटना झाल्या आहेत. ९६ टक्के बलात्कार प्रकरणे ही पॉस्को अंतर्गत नोंदली गेली आहेत. यात गुन्हेगार पीडितांना ओळखणारे आहेत.

पोलिसांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिल्लीत २०१९ मध्ये दरोडय़ाचे २.३७ लाख, गुन्हे घडले असून २०१५ च्या तुलनेत ते १६६ ने वाढले आहेत. सायबर गुन्ह्यंचे प्रमाण २०१९ मध्ये ११५ होते.

दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यत पोलिसांचा सायबर विभाग आहे. ही संख्या अपुरी असल्याने सायबर गुन्हे नोंदणीचे प्रमाण कमी आहे. दिल्लीत २०१९ मध्ये ४.१० लाख गुन्ह्यंचा तपास केला गेला. त्यात २४ टक्के गुन्ह्यंचा तपास प्रलंबित आहे, असेही संस्थेतर्फे सांगण्यात आले.