मुलांवरील बलात्काराच्या घटनेत ३०० टक्क्यांनी वाढ

२००१ ते २०११ मध्ये मुलांवरील बलात्काराची एकंदर ४८,३३८ प्रकरणे नोंदवली गेली. राजधानी दिल्लीसह देशभरात मुलांवरील बलात्काराच्या घटनांचे २००१ ते २०११ या दहा वर्षांचे आकडे पहिले असता, मुलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये ३०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे निदर्शनास येते.

२००१ ते २०११ मध्ये मुलांवरील बलात्काराची एकंदर ४८,३३८ प्रकरणे नोंदवली गेली. राजधानी दिल्लीसह देशभरात  मुलांवरील बलात्काराच्या घटनांचे २००१ ते २०११ या दहा वर्षांचे आकडे पहिले असता, मुलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये ३०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे निदर्शनास येते.  एका सरकारी अधिका-याच्या म्हणण्यानुसार, २००१ मध्ये मुलांवरील बलात्काराची २११३ प्रकरणे नोंदवली गेली. तर २०११ मध्ये अशाच प्रकारच्या घटनांची ७११२ प्रकरणे नोंदवली गेली. या आकडेवारीवरून मुलांवरील बलात्काराच्या नोंदणीकृत घटनांमध्ये जवळजवळ ३३५ टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास येते.
ही अकडेवारी म्हणजे समुद्रातील एका थेंबासारखी असून, अशाप्रकारच्या अनेक घटना समोर येत नाहीत आणि याविषयीची सूचना पोलिसांतदेखील दिली जात नाही.  वास्तवात मुले ही बलात्कारा व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या लैंगिक हिंसेचे शिकार बनत असतात. लोकांमध्ये काही प्रमाणात जागरूकता आली असून, आता ते अशाप्रकारच्या घटनांची सूचना पोलिसांना  देऊ लागले आहेत.
मुलांवरील बलात्काराच्या  अनेक घटना या बाल सुधारगृहात होत असतात. ही बाल सुधारगृहे  शासनाची मान्यता प्राप्त अथवा नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. परंतु, शेकडो बाल सुधारगृहे ही नोंदणीकृत नाहीत आणि अशा बालसुधार गृहांमध्ये मुलांवर होणा-या बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
२००१ ते २०११ मध्ये मुलांवर झालेल्या बलात्काराच्या नोंदणीकृत घटनांची आकडेवारी ४८,३३८ इतकी आहे. राज्यांविषयी सांगायचे झाले तर अशाप्रकारच्या घटना मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. एका सर्वेक्षणाच्या आधारे येथे दरवर्षी मुलांवर होणा-या बलात्काराच्या ९४६५ घटनांची नोंदणी केली गेल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रात मुलांवरील बलात्काराच्या ६८६८ घटना नोंदविल्या गेल्या आहेत.  उत्तर प्रदेशात ५९४९, आंध्रप्रदेशात ३९७७, छत्तीसगडमध्ये ३६८८, दिल्लीत २९०९, राजस्थानात २७७६, केरळमध्ये २१०१, तामिलनाडूत १४८६, हरियाणामध्ये १०८१, पंजाबमध्ये १०६८, गुजरातमध्ये ९९९ आणि पश्चिम बंगालमध्ये ७४४ घटनांची नोंद झाली आहे. राज्यांमध्ये आणि केंद्रशासित क्षेत्रात लक्षद्वीप हा एकमात्र असा प्रदेश आहे जेथे २००१ ते २०११ मध्ये मुलांवरील बलात्काराच्या एकाही घटनेची नोंद अढळून येत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 336 increase in child rape cases last decade 48338 child rape cases between 2001