मुलीच्या घरच्यांना मोठा हुंडा देऊन १५ वर्षांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या सौदी व्यक्तीचा येथील मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून आणि ‘सोशल मीडिया’मधून तीव्र निषेध करण्यात येत आह़े  या बळजबरीच्या लग्नामुळे बावरलेल्या मुलीने दोन दिवस आपल्या वृद्ध पतीला शयनगृहाबाहेर पिटाळून लावले आणि तिसऱ्या दिवशी माहेरी पळ काढला़ आपले लग्न कायदेशीरीत्या वैध आणि योग्य असून मुलीच्या माहेरच्यांनी तिला सासरी परत पाठवावे किंवा माझा १७ हजार ५०० डॉलरचा हुंडा परत करावा, अशी भूमिका या थोराड नवरोबाने घेतली आह़े  या मुलीची आई सौदी तर वडील येमेनी आहेत़
सौदी राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेचे सदस्य सुहाईला झेइन अल्- अबेदिन यांनी संबंधित शासकीय संस्थांना या प्रकरणात लक्ष घालून दुर्दैवी मुलीला वाचविण्याचे आवाहन केले आह़े  तसेच ट्विटर, फेसबुकसारख्या सोशल मीडियावरही मुलीच्या मात्या- पित्यांचा आणि वृद्ध नवरोबाचा निषेध करण्यात येत आह़े