पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या हवाई वाहतूक प्रशासनाच्या ‘फेडरल एव्हिएसन एजन्सी’ (एफएए) यंत्रणेत मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपूर्ण देशातील शेकडो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली.विनाखंड विमान वाहतूक व सुरक्षिततेच्या सर्व निकषांच्या पूर्ततेची शहानिशा करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी ‘एफएए’ने विमान कंपन्यांना सर्व देशांतर्गत वाहतूक सकाळी नऊपर्यंत (इस्टर्न टाईम) स्थगित करण्याचे म्हणजे विमान उड्डाणे तोपर्यंत लांबणीवर टाकण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही आमची विमाने उतरवण्यास सुरुवात केल्याचे विमान कंपन्यांनी स्पष्ट केले.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

‘एअर मिशन्स सिस्टम’ला दिलेल्या आपल्या सूचना पुर्नसचयित करण्यासाठी ‘एफएए’ काम करत आहे. आम्ही अंतिम शहानिशा करण्यासाठीच्या चाचण्या (फायनल व्हॅलिडेशन चेक्स) करत आहोत आणि आता ही प्रणाली पुनप्र्रस्थापित करत आहोत. संपूर्ण राष्ट्रीय ‘एअरस्पेस सिस्टम’च्या कार्यप्रणालीवर परिणाम झाला आहे, असे ‘एफएए’तर्फे सांगण्यात आले. अमेरिकेच अध्यक्ष जो बायडेन यांना परिवहन मंत्री पीट बुटिगीग यांनी यंत्रणेतील या बिघाडाची माहिती दिली आहे.

‘व्हाईट हाऊस’च्या प्रसिद्धी सचिव करीन जीन-पियरे यांनी यांनी ‘ट्वीट’संदेशात नमूद केले, की या सायबर हल्ल्यामुळे हा बिघाड झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. तरीही अध्यक्षांनी दूरसंचार विभागाला या बिघाडामागील कारणांचा संपूर्ण तपास करण्याचे आदेश दिले आहेत. ‘एफएए’ याबाबतची अद्ययावत माहिती नियमित देत राहील. ‘नोटिस टू एअर मिशन सिस्टम’च्या अपयशामुळे हा बिघाड निर्माण होतो. या यंत्रणेद्वारे वैमानिक आणि इतर कर्मचार्याना हवाई समस्यांबद्दल आणि देशभरातील विमानतळांवरील इतर विलंबांबद्दल सतर्क केले जाते. ‘फ्लाइट अवेअर’ या विमानवाहतुकीची माहिती देणाऱ्या कंपनीच्या मते, अमेरिकेतील किंवा विदेशात जाणाऱ्या १२०० हून अधिक विमानांना विलंब झाला आहे. यापेकी शंभरहून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली.

परिस्थितीवर बारकाईने लक्ष
परिवहन मंत्री बुटिगीग यांनी ‘ट्वीट’द्वारे सांगितले, की मी ‘एफएए’च्या संपर्कात असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. वैमानिकांना सुरक्षेची माहिती देण्यासाठी मुख्य प्रणालीवर परिणाम करणाऱ्या या बिघाडाबद्दल बुधवारी सकाळपासून मी ‘एफएए’च्या संपर्कात आहे. हवाई वाहतूक पूर्ववत सुरू होण्यासाठी ‘एफएए’ या समस्येचे त्वरित व सुरक्षित पद्धतीने निराकरण करण्यासाठी काम करत आहे. याबाबतची अद्ययावत माहिती देत राहील. ‘आउटेज’नंतर ‘नोटिस टू एअर मिशन सिस्टम’ पूर्णपणे पुर्नसचयित करण्यासाठी ‘एफएए’अजूनही काम करत आहे. काही सेवा पूर्ववत होत असताना ‘नॅशनल एअरस्पेस सिस्टम ऑपरेशन’ मर्यादित प्रमाणात होतात, असेही ‘एफएए’ने स्पष्ट केले.