दंगल आणि गुन्हेगारी कृत्यांच्या आरोपांवरून आम आदमी पक्षाचे दिल्लीतील आमदार अखिलेश त्रिपाठी यांनी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून अटक करण्यात आलेले त्रिपाठी हे पाचवे आमदार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल टाऊन या मतदारसंघातून अखिलेश त्रिपाठी निवडून आले आहेत. दंगल आणि गुन्हेगारी कृत्यांप्रकरणी त्यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतरही न्यायालयात उपस्थित न राहिल्यामुळे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. २०१३ मध्ये घडलेल्या दंगलीमध्ये ते आरोपी आहेत. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ३२३ आणि ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap mla akhilesh tripathi arrested by delhi police
First published on: 27-11-2015 at 11:44 IST