अटक करण्यात आलेला दहशतवादी अब्दुल करीम ऊर्फ टुंडा याचा मुलगा अब्दुल वारिस हा सध्या जम्मू-काश्मिरमध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसाठी कार्यरत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकतेच टुंडा याला भारत-नेपाळ सीमेवर अटक केली होती. त्यानंतर त्याला दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सध्या टुंडा पोलीस कोठडीत असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत आतापर्यंत टुंडाने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान, आता त्याने आपला मुलगा लष्कर-ए-तैयबासाठी काम करत असल्याचे म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टुंडाची दुसरी पत्नी मुमताज हीचा तिसरा मुलगा अब्दुल वारिस हा जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये कार्यरत आहे. इतकेच नाही तर टुंडाच्या मुलाने भारतामध्ये आठ वर्षांचा तुरूंगवासही भोगला आहे. तुरूंगवास भोगल्यानंतर वारिस पाकिस्तानमध्ये वडिल टुंडाना भेटला आणि तेथूनच लष्कर-ए-तैयबामध्ये सहभागी झाला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
टुंडाचा मुलगा काश्मिरमध्ये ‘लष्कर-ए-तैयबा’साठी कार्यरत
अटक करण्यात आलेला दहशतवादी अब्दुल करीम ऊर्फ टुंडा याचा मुलगा अब्दुल वारिस हा सध्या जम्मू-काश्मिरमध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसाठी
First published on: 20-08-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul karim tundas son worked for lashkar e taiba