तरुणीने कुत्र्यासोबत सेक्स केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयर्लंडमधील २९ वर्षीय तरुणीवर मिक्स ब्रिड असणाऱ्या कुत्र्यासोबत (part Rottweiler) आपल्या निवासस्थानी सेक्स केल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०१९ रोजी हा प्रकार घडला असून याप्रकरणी जून महिन्यात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. डबलीन डिस्ट्रिक्ट कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.
द आयरिश सनने दिलेल्या रिपोर्टनुसार, फिर्यादींनी सर्व पुरावे गोळा केले आहेत. न्यायाधीश ट्रेसा केली यांना फिर्यादींनी पुरावे गोळा करण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती दिल्यानंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात करण्यात आली. ३ सप्टेंबरला न्यायालयात याप्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी सुरु झाली आहे.
मात्र आरोपी यावेळी कोर्टात हजर नव्हती. बचाव पक्षाच्या वकिलांनी पुरावे इतक्या लवकर तयार होतील अशी अपेक्षा केली नसल्याने आरोपी तरुणी गैरहजर असल्याचं सांगितलं. यानंतर सुनावणी स्थगित करुन पुढच्या महिन्यातील तारीख देण्यात आली. आरोपी सध्या जामीनावर बाहेर आहे. पुढील सुनावणीत पुराव्यांच्या आधारे आरोपी तरुणीला सर्किट कोर्टात खटल्याला सामोरं जावं लागू शकतं. यावेळी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.