चेन्नई विमानतळावर उतरलेल्या गो-एअरच्या विमानाला शुक्रवारी सकाळी प्रवाशांना चढ-उतारासाठी वापरली जाणारी शिडीची गाडी (एरोब्रिज) धडकली. यामुळे विमानाच्या प्रवासी दरवाजाजवळील भागाचे नुकसान झाले. ही घटना घडली त्यावेळी विमानात १६८ प्रवासी होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
गो-एअर कंपनीचे हे विमान मुंबई प्रवाशांना घेऊन शुक्रवारी सकाळी ६.३५ वाजता मुंबई विमानतळावर उतरले. यानंतर विमानाच्या दरवाजाला एरोब्रिज घेऊन येणार चालक वेगाने येत होता. त्याचे एरोब्रिजच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ते थेट विमानाला जाऊन धडकली. यामुळे विमानाच्या पुढच्या दरवाजाजवळील काही भागाचे नुकसान झाले. एरोब्रिज घेऊन येणाऱया चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले. त्याने गाडीचा वेग जास्त ठेवल्यामुळे त्याला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे एरोब्रिज विमानाला जोडला जाण्याऐवजी तो थेट धडकला. यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्यात येत असून, त्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येणार आहे.