आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरातमधील एका तरूणाला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला होता. मात्र, अहमद पटेल यांनी बुधवारी जंबुसार येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपवर त्यांच्याच डाव उलटवण्याचा प्रयत्न केला. आयसिसशी संबंध असल्याच्या संशायवरून अटक करण्यात आलेला तरूण ज्या रूग्णालयात काम करत होता, ते रूग्णालय एका भाजप नेत्याचेच आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच रूग्णालयाचे उद्घाटन केल्याचे अहमद पटेल यांनी सांगितले.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आयसिसच्या एका हस्तकाला अटक होण्यापूर्वी तो गुजरातमधील ज्या रुग्णालयात कामाला होता त्या रुग्णालयाशी काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याच्या आरोप केला होता. अहमद पटेल यांचे सदर रुग्णालयाशी १९७९ पासून अतिशय जवळचे संबंध आहेत. पटेल या रुग्णालयाचे विश्वस्त होते, असे भाजपने म्हटले होते. त्याला आज अहमद पटेल यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच भोपाळमध्ये काही दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या दहशवाद्यांचे भाजपच्या नेत्यांशी लागेबांधे असल्याचा नवा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

गुजरातमध्ये जातींची समीकरणे धारदार

भाजप नेते दहशतवादाबद्दल बोलतात. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी दहशतावादाची झळ अनुभवली आहे. भाजपच्या आरोपानंतर मी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तेव्हा आयसिससशी संबंधित हा तरूण भाजप नेत्याने सुरू केलेल्या रूग्णालयात काम करत असल्याची माहिती समोर आली. या रुग्णालयाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, आता गुजरातमध्ये पराभवाच्या भीतीने नैराश्य आलेले भाजप नेते माझ्या खासदारकीचा राजीनामा मागत आहेत. राज्यसभेची निवडणूक मी काँग्रेस आमदारांच्या बळावर जिंकली. त्यामुळे याबाबत जो निर्णय घ्यायचा आहे तो न्यायव्यवस्थेला घेऊन द्यावा, असे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप पटेल यांच्या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने आयसिसच्या दोन संशयितांना अटक केली. त्यापैकी एक आरोपी कासिम स्टिंबरवाला हा भडोच जिल्ह्य़ातील अंकलेश्वर येथील सरदार पटेल रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून कामाला होता, अशी माहिती पुढे आली होती.

गुजरातमध्ये भाजप- आपची छुपी युती?, काँग्रेसची मते फोडणार