अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. आत्महत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला अवस्थेत आढळला असून पोलिसांना खोलीचे दरवाजेही चारही बाजूंनी बंद असल्याचे आढळले आहे, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. महंत नरेंद्र गिरी आत्महत्या करूच शकत नाही असं त्यांच्या अनुयायांचं म्हणणं असून सीबीआय तपासाची मागणी केली आहे.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश याद यांनी त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. “ईश्वर पुण्य आत्म्याला आपल्या चरणी स्थान आणि त्यांच्या अनुयायांना दुख सहन करण्याची शक्ती देवो”, असं ट्वीट अखिलेश यादव यांनी केलं आहे.

निरंजनी आखाड्यातून निष्कासित योगगुरु आनंद गिरी आणि अखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मंदिर-मठ यांच्या जागेवरून वाद शिगेला पोहोचला होता. स्वामी आनंद गिरी यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवून वादाची माहिती दिली होती. कीडगंज येथील गोपाल मंदिर अर्ध विकल्याचा आरोप त्यांनी केला होता. मठ आणि मंदिराच्या विकलेल्या जमिनी विकून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्याचबरोबर हनुमान मंदिरात येणाऱ्या लाखो रुपयांची देणगी आणि बेहिशोबी उत्पन्नाची चौकशीची मागणी केली होती. यानंतर बराच वाद झाला होता. त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागून वादावर पडदा टाकला होता.

६०० दिवसांपासून परदेश दौरा नाही, फोनवरुनच चर्चा अन् अचानक… चिनी राष्ट्राध्यक्षांना झालाय गंभीर आजार?

काही आठवड्यांपूर्वी अखिल भारतीय अखाडा परिषदेच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट खात्याद्वारे वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते.य त्यानंतर नरेंद्र गिरी महाराजांनी दारागंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.