येमेनमध्ये असलेला अल कायदा या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला असल्याचा दावा येमेनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने केला आहे. सईद अल शिहरी असे या अतिरेक्याचे नाव असून तो येमेनमधील अल कायदाचा उपप्रमुख होता. सईद हा सौदी अरेबियाचा नागरीक होता. अफगाण युद्धात त्याने भाग घेतला होता. ग्वांटानामो बे येथील अमेरिकेच्या युद्धकैद्यांच्या तुरुंगात त्याने ६ वर्षे काढली. सादा शहराच्या दक्षिणेकडील भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये २८ नोव्हेंबर रोजी तो जखमी झाला होता. तेव्हापासून तो कोमातच होता. अखेर गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.