अमेरिकेत विवाहाचे प्रमाण गेल्या शतकात सर्वात कमी म्हणजे ३१.०१ टक्क्य़ांवर घसरले असल्याचे एका नव्या अभ्यासात आढळून आले आहे.
अमेरिकेत महिलांचे विवाहबद्ध होण्याचे प्रमाण कमी असून विवाह करण्यापूर्वी त्या बराच कालावधी प्रतीक्षा करीत राहतात, असे बोलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीतील नॅशनल सेंटर फॉर फॅमिली अ‍ॅण्ड मॅरेज रिसर्चने केलेल्या पाहणीत आढळले आहे.
सध्याचे विवाहाचे प्रमाण ३१.१ टक्के इतके असून ते या शतकातील सर्वात कमी प्रमाण आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर एक हजार विवाहित महिलांच्या तुलनेत हे प्रमाण ३१ इतके आहे. विवाहाचे हेच प्रमाण १९२० मध्ये ९२.३ टक्के इतके होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
त्यानंतर १९७०च्या दशकापासून विवाहाचे प्रमाण ६० टक्क्य़ांनी घसरले. विवाह सक्तीचा नाही तर तो एक पर्याय आहे. बहुसंख्य दाम्पत्ये सहजीवनाचा मार्ग स्वीकारतात तर अन्य काही जण एकटेच राहणे पसंत करतात, असे डॉ. सुझान ब्राऊन यांनी म्हटले आहे.