Premium

“नितीमत्ता समितीच्या अहवालावर किमान…”, महुआ मोईत्रांवरील कारवाईनंतर अमोल कोल्हेंचा संताप; म्हणाले, “माझी सहकारी…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावरील कारवाईचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.

mahua moitra amol kolhe
महुआ मोईत्रा म्हणाल्या, लोकसभेने संसदीय समितीचा हत्यारासारखा वापर केला आहे. (PC : Amol Kolhe, Mahua Moitra Facebook)

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेमधून बडतर्फ करण्यात आलं आहे. मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर आरोप करत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रारही केली होती. यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार याप्रकरणी संसदीय नीतिमत्ता समितीकडून मोईत्रा यांची चौकशी करण्यात आली. ही चौकशी आणि कॅश फॉर क्वेरीप्रकरणी तपास करून नीतिमत्ता समितीने शुक्रवारी (८ डिसेंबर) त्यांचा अहवाल लोकसभेत सादर केला आणि मोईत्रा यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितीमत्ता समितीच्या अहवालाच्या आधारावर मोईत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. मोईत्रा यांच्यावरील या कारवाईनंतर विरोधी पक्षांमधील अनेक नेते, इंडिया आघाडीचे नेते त्यांच्या समर्थनात उभे राहिले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यासह संपूर्ण पक्ष मोईत्रा यांच्या बाजूने उभा आहे. काँग्रेसनेही या कारवाईचा निषेध केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील या कारवाईचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून सर्वांच्या स्मरणात राहील. तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि माझ्या सहकारी महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारला काही अवघड प्रश्न विचारले होते. त्यामुळे त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. नितीमत्ता समितीच्या अहवालाद्वारे हा निर्णय घेण्यात आला. परंतु, गंमत अशी आहे की, समितीने मांडलेल्या अहवालावर साधी चर्चासुद्धा घेण्याचा विचार या सरकारने केला नाही. सरकार सभागृहातील खासदारांचा आवाज कसा बंद राहील यासाठी प्रयत्न करत आहे. हे त्यांच्या वृत्तीवरून दिसतंय. हे सगंळ भयंकर आहे. त्यांनी लोकशाहीची तत्वे चिरडली आहेत. सरकारच्या या भ्याड कृत्याचा मी निषेध करतो.

हे ही वाचा >> ‘रस्त्यावर, गटारात, सभागृहात… जिथे जिथे भाजपा, तिथे त्यांच्याशी संघर्ष करणार’, महुआ मोईत्रा भाजपवार बरसल्या

दरम्यान, लोकसभा अध्यक्षांनी केलेल्या कारवाईनंतर महुआ मोईत्रा म्हणाल्या, जी आचारसंहिताच अस्तित्वात नाही, तिचं उल्लंघन केल्याप्रकरणी मला दोषी ठरवलं आहे. लोकसभेत इतर सर्व खासदार जी पद्धत वापरतात, तीच पद्धत मीही वापरली आहे. तरीदेखील नीतिमत्ता समिती मला शिक्षा देत आहे, हे अजबच आहे. लोकसभेने संसदीय समितीचा माझ्याविरोधात शस्त्रासारखा वापर केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amol kolhe slams modi govt for expelling mahua moitra from lok sabha asc

First published on: 08-12-2023 at 23:47 IST
Next Story
Aditya L1 चं मोठं यश, पाठवले सूर्याचे जवळून काढलेले फोटो, भास्कराचं हे रूप तुम्ही कधीच पाहिलं नसेल