पीटीआय, बंगळूरु

कर्नाटकमध्ये भाजप सत्तेवर असताना करोना महासाथीच्या काळात औषधे व उपकरणांची खरेदी आणि प्राणवायूच्या पुरवठय़ातील कथित अनियमितता यांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमला आहे.न्या. जॉन मायकल डी’कुन्हा यांच्या अध्यक्षतेखालील हा आयोग तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याची अपेक्षा असल्याचे राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा आदेश जारी करताना सांगितले.

Complaint of violation of code of conduct against Mahavikas Aghadi candidate Sanjog Waghere
मावळ : महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
Political controversy over Prajwal Revanna inquiry
प्रज्वल रेवण्णाच्या चौकशीवरून राजकीय वाद; भाजप सीबीआयसाठी आग्रही तर मुख्यमंत्री ‘एसआयटी’ तपासावर ठाम
supreme court
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू, अध्यक्षपदाबाबतही खंडपीठाकडून महत्त्वाचे निर्देश
Delhi Lieutenant Governor V K Saxena
राज्यपालांचा एक आदेश अन् महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! माजी अध्यक्षांवर केला गंभीर आरोप
Do Anjali Damania and Suhas Kande have the right to challenge the acquittal Chhagan Bhujbals question in HC
महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्तीला आव्हान देण्याचा अधिकार दमानिया, कांदे यांना आहे का? उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान भुजबळ यांच्याकडून प्रश्न उपस्थित
Suspect arrested from Yerawada area in view of Prime Minister visit pune print news
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातून संशयित ताब्यात
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’

औषधे व उपकरणांच्या खरेदीबाबत, तसेच लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या प्राणवायू पुरवठय़ातील गैरव्यवस्थापनाबाबत सार्वजनिक लोकलेखा समितीने जुलै-ऑगस्टमध्ये सादर केलेल्या अहवालात लावलेल्या गंभीर आरोपांची आपण दखल घेतली असल्याचे सरकारच्या आदेशात म्हटले आहे. संबंधित खात्यांना तपासाकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे आणि कर्मचारी, जागा, स्टेशनरी, वाहन आणि कार्यालय चालवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे पुरवावी लागतील, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>‘एआय’च्या नैतिक उपयोगासाठी प्रयत्नांची गरज; ‘बी-२० परिषदे’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

यापूर्वीच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात कोविड व्यवस्थापनात मोठय़ा प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप सत्ताधारी काँग्रेस करत आला आहे. सत्तेवर आल्यास या अनियमिततांची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.