एका महिलेने तिच्या पतीची हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह पेटवला. या प्रकरणी या महिलेला अटक करण्यता आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने हत्येची कबुली दिली आहे. तिचा पती तिला रोज मारहाण करत होता आणि तिचा छळ करत होता त्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

शेती वाटणीच्या वादातून चार जणांची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील तीन जणांना फाशीची शिक्षा

नेमकी कुठे घडली घटना?

आसामच्या जोरहट जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. जोरहाट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्वेतांक मिश्रा यांनी स्पष्ट केलं की महिलेचा मुलगा अल्पवयीन आहे त्यामुळे त्या मुलाला किशोर न्यायालयात धाडण्यात येईल आणि त्याची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी हेदेखील सांगितलं की त्या महिलेने सांगितलं या महिलेचा पती तिला रोज दारु पिऊन मारहाण करत होता. तिने तिच्या मुलाला वाचवण्यासाठी हत्येसारखं भयंकर पाऊल उचललं.

पराकोटीचा छळ, जबरदस्तीने विवाह, बलात्कार, मानवी तस्करी अन्…; महिलांचा युद्धात ‘असा’ जातो बळी

प्रल्हाद सोरेन असं मृत्यू झालेल्या माणसाचं नाव आहे

ज्या माणसाची हत्या झाली त्याचं नाव प्रल्हाद सोरेन असं आहे. प्रल्हाद सोरेन चहाच्या मळ्यात शेतमजूर म्हणून काम करत होता. जोरहाटच्या मरियानी भागात असलेल्या चहा मळ्यात गुरुवारी रात्री त्याला त्याच्या पत्नीने ठार केलं. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून टाकला. हे करताना काही लोकांनी या महिलेला पाहिलं. त्यानंतर या महिलेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली. पोलीस घटना स्थळी पोहचले तेव्हा त्यांनी महिलेच्या पतीचं अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.