दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा राग, महिलेचा माजी प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला

आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना

(संग्रहित छायाचित्र)

आपल्यासोबतचं नात तोडून दुसऱ्या महिलेशी लग्न केल्यामुळे संतापलेल्या महिलेने…आपल्या माजी प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नल जिल्ह्यातील पेड्डा कोट्टाला गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रियकराचं नाव नागेंद्र असं असून तो स्थानिक किराणा मालाच्या दुकानात काम करतो.

नागेंद्र आणि सुप्रिया गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनीही लग्न करायचं ठरवलं होतं…परंतू दोघेही वेगळ्या जातीतले असल्यामुळे पालकांनी लग्नास नकार दिला होता. यामुळे नागेंद्रने गेल्या महिन्यात लक्ष्मी या महिलेशी लग्न केलं. आपल्या प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचं समजताच संतापलेल्या सुप्रियाने शुक्रवारी त्याच्यावर अ‍ॅसिड फेकलं. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागेंद्रवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांना दिलेल्या जबाबात नागेंद्रने आपण सुप्रियाशी बोलून चर्चा करुन आपलं नातं तोडल्याचं सांगितलं. दोघांनीही ब्रेक-अप केल्यानंतर सुप्रियाने आपल्याकडून पैसेही घेतल्याचं नागेंद्रने सांगितलं. याआधीही आपल्यावर अशाच प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचं नागेंद्रने सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आरोपी सुप्रियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Andhra pradesh woman attacks ex boyfriend with acid for marrying another woman psd

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या