उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथून परतत असताना आपल्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी केला आहे. गोला येथून रविवारी रात्री लखनऊला परतत असताना आपल्या वाहनांच्या ताफ्याचा एका ट्रकने पाठलाग केला. जवळपास १५ कि.मी. पर्यंत पाठलाग केल्यानंतर ट्रकने ताफ्यातील एका वाहनाला धडक दिली. त्यामध्ये आपला जनसंपर्क अधिकारी आणि सुरक्षा रक्षक जखमी झाले. मात्र वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्याने आपला जीव वाचला, असे अनुप्रिया पटेल म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2014 रोजी प्रकाशित
खासदार अनुप्रिया पटेल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथून परतत असताना आपल्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी केला आहे. गोला येथून रविवारी रात्री लखनऊला परतत असताना आपल्या वाहनांच्या ताफ्याचा एका ट्रकने पाठलाग केला.
First published on: 18-11-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apna dal mp anupriya patel alleges attempt on her life