लष्करप्रमुख जनरल बिक्रमसिंग यांनी रविवारी भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. मे महिन्यात लष्करप्रमुखपद स्वीकारल्यानंतर प्रथमच बिक्रमसिंग यांनी लष्कराच्या पूर्व कमांडला भेट दिली. यावेळी पूर्व विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल दलबीरसिंह सुहाग उपस्थित होते.गेल्या काही महिन्यांपासून भारताने चीनलगतच्या सीमारेषेवर पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीचा उपक्रम हाती घेतला आहे. आपत्कालीन परिस्थितीत लष्कराच्या हालचाली जोरदार व्हाव्यात यासाठी ही तयारी सुरू आहे. या कमांडमध्ये लष्कराची तयारी कितपत आहे याचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख शनिवारपासून या भागाच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष जवानांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. लेफ्टनंट जनरल सुहाग यांनीही लष्करी तुकडय़ांच्या तयारीची माहिती लष्करप्रमुखांना दिली.