बरेलीनजीक बुधवारी सकाळी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून तीनजणांचा मृत्यू झाला. येथील हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हेलिकॉप्टर खाली कोसळले. यामध्ये दोन वैमानिकांसह एका अभियंत्याचा मृत्यू झाला. लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर नेहमीच्या उड्डाणासाठी निघाले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हवेत उड्डाण केल्यानंतर लगेचच हेलिकॉप्टर हेलकावे खाऊ लागले होते. त्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागली आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Oct 2014 रोजी प्रकाशित
लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू
बरेलीनजीक बुधवारी सकाळी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून तीनजणांचा मृत्यू झाला. येथील हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच हेलिकॉप्टर खाली कोसळले. यामध्ये दोन वैमानिकांसह एका अभियंत्याचा मृत्यू झाला.

First published on: 01-10-2014 at 11:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army helicopter crashes in bareilly three officers killed