इसिसने ऑस्ट्रेलियात एका समारंभाच्या वेळी चाकूहल्ले करण्याचा कट आखला होता तो उधळण्यात आला असून, किमान पाच युवकांना दहशतवादी कट आखल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी मेलबर्न व इतरत्र छापे टाकून पाच जणांना अटक केली. दोनशे पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हुतात्मा सैनिकांच्या स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात चाकूने लोकांना भोसकण्याचा या तरुणांचा डाव होता.
हल्लम या उपनगरातील १८ वर्षांच्या युवकावर दहशतवादी कट आखल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला मेलबर्न न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आणखी एका १८ वर्षांच्या युवकास हॅम्पटन पार्क येथून दहशतवादी कारवायांच्या गुन्हय़ात अटक करण्यात आली असून, तिसऱ्या एका व्यक्तीला शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली. इतर दोघांना अटक करण्यात आली असून, ते कोठडीत आहेत. त्यांच्या जाबजबाबातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2015 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियात दहशतवाद्यांचा कट उधळला
इसिसने ऑस्ट्रेलियात एका समारंभाच्या वेळी चाकूहल्ले करण्याचा कट आखला होता तो उधळण्यात आला असून, किमान पाच युवकांना दहशतवादी कट आखल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
First published on: 19-04-2015 at 01:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia arrests five teenagers on charges of plotting anzac day attack