ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट हे त्यांच्या सत्तेला १७ महिने पूर्ण होत असताना मांडण्यात आलेल्या विश्वास ठरावावर थोडक्यात बचावले आहेत. जवळपास तो मृत्यूचा अनुभव होता, असे त्यांनी ठरावाच्या वेळी सांगितले. लिबरल पक्षाच्या खासदारांशी बोलताना अबॉट यांनी असे आश्वासन दिले, की सरकार चालवण्याच्या पद्धतीत बदल केले जातील व सरकार पुन्हा ठीकठाक करण्यासाठी त्यांनी सहा महिने मागितले आहेत.
अबॉट यांनी सांगितले, की  विश्वास ठराव ६१-३९ मतांनी आपण जिंकला. एबीसी प्रसारण कंपनीच्या मते एका खासदाराने चिठ्ठीवर केवळ ‘पास’ असे लिहिले. लिबरल पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, अबॉट यांना हा धक्का होता कारण त्यांचे संख्याबळ कमी होते. आम्ही तुमच्यासाठी व निवडून देणाऱ्या लोकांसाठी काम करण्यास वचनबद्ध आहोत.