आठ महिन्यांच्या चिमुरडीला एका रिक्षाचालकाने इंजेक्शन दिल्यामुळे बुधवारी तिला प्राणाला मुकावे लागले. मुलीच्या कुटुंबीयांना याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित रिक्षाचालकाने मद्यपान केले होते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
ही घटना बुधवारी सकाळी घडली. मद्यपान केलेल्या रिक्षाचालकाने संबंधित मुलीला इंजेक्शन दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक के. सी. गोस्वामी यांनी सांगितले.
बालियाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश के. पी. सिंग यांनी या घटनेची सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा न्यायाधीशांकडे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये याच रुग्णालयात अतिदक्षता विभागातील एका रुग्णावर सफाई कर्मचाऱयाने उपचार केल्याचे आढळले होते.