केंद्रीय कामगार संघटनांनी २० आणि २१ फेब्रुवारी या दिवशी पुकारलेल्या देशव्यापी संपात आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे या दोन दिवशी बँकांच्या व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे.
एआयबीईए, एनसीबीई, बीईएफ आय, आयएनबीईएफ, एनओबीडब्ल्यू आणि एआयबीओसी अशा नऊ विविध संघटनांचा समावेश असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनने (यूएफबीयू)  आपल्या मागण्यांसाठी देशव्यापी संपाची हाक दिली आह़े  दिल्ली स्टेट बँक एम्प्लॉई फेडरेशनने आपल्या पत्रकात रिझव्‍‌र्ह बॅंकेसह सर्वच बँकाचे कामकाज थंडावणार असल्याचे स्पष्ट केले आह़े  दरम्यान, संप रद्द करण्याची पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची मागणी ‘आयटक’ या संघटनेने फेटाळून लावली आहे.