मेरठमध्ये आयोजित ‘द ललनटॉप अड्डा’मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती आणि महागाई या विषयावर एक संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांसह सपा, बसपा आणि आरएलडीचे नेतेही येथे उपस्थित होते. भाजपा नेते जीडीपीवर बोलू शकण्यापूर्वीच आरएलडी नेत्याने त्यांना आव्हान दिले आणि जीडीपीचा फूल फॉर्म विचारला. त्यावर भाजपा नेत्याने टाळाटाळ केली. नंतर कार्यक्रमातच त्याने गुपचूप आपला मोबाईल काढली आणि गुगलवर चेक करायला सुरुवात केली.

‘द ललनटॉप अड्डा’चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी भाजपा नेत्याला विचारले की, कोविड येण्यापूर्वीच अर्थव्यवस्था घसरली होती, त्यावर तुम्ही काय म्हणाल? या प्रश्नाला उत्तर देताना भाजपा नेते म्हणाले की, भाजपचे सरकार येताच अर्थव्यवस्था घसरली असे नाही.

भाजप नेत्याच्या बोलण्यावर पत्रकाराने, तेच झाले आहे असे म्हटले. अटलबिहारी सरकारच्या काळापासून अर्थव्यवस्था उंचावली होती, त्याचा फायदा यूपीएलाही झाला. मात्र नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था ढासळल्याचे लोकांचे म्हणणे आहे. आता तुम्ही लोक नोटबंदीचा वर्धापन दिनही साजरा करत नाही, असे पत्रकाराने म्हटले. त्याचवेळी आपला मुद्दा करत भाजपा नेत्याने आता करोना महामारी आली आहे, असे म्हटले.

त्यानंतर पत्रकाराने करोनापूर्वीच अर्थव्यवस्था खाली जात होती असल्याचे म्हटले. यावर भाजपा नेत्याने, “आम्ही त्यात सुधारणा करत असतानाच करोना आला,” असे म्हटले. दरम्यान, आरएलडी नेत्याने भाजपा नेत्याला जीडीपीचा फूल फॉर्म विचारला आणि जीडीपीबद्दल आपण नंतर बोलू, आधी त्यांना जीडीपीचे पूर्ण स्वरूप विचारा, मी आव्हान देतो, असे म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावर उत्तर देताना भाजपा नेत्याने, तुम्ही एका वृत्तवाहिनीचे अँकर बना. मला तीनही कृषी कायद्यांबद्दल सांगा, असे म्हटले. चर्चेदरम्यान भाजपा नेत्याने गुपचूप मोबाईल काढून जीडीपीचा फूल फॉर्म गुगलवरही तपासण्यास सुरुवात केली. दुसरीकडे आरएलडी नेतेही केवळ कंत्राटी शेतीबाबत बोलून गप्प बसले, त्यानंतर पत्रकारालाच त्यांना कायद्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.