आगामी लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
भाजपचे खासदार शमशेर सिंग मन्हास यांनी सांगितले की, लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सर्व २६ जागा लढविण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी मित्र पक्षांशी युती करता येणार असली तरी आम्ही स्वतंत्र लढण्याबाबत विचार करत आहोत. पक्ष नेत्यांनी नुकतीच लडाखला भेट दिली असून पूरग्रस्त भागासाठी एक कोटी दहा लाख रुपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मन्हास म्हणाले की, पूरस्थितीमुळे लडाखचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जम्मू प्रांताचा विकास हेच आमचे लक्ष्य आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2015 रोजी प्रकाशित
लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या सर्व जागा भाजप लढविणार
आगामी लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 04-09-2015 at 03:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp to contest all 26 seats of ladakh autonomous hill development council